बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि नाना पाटेकर 1999 साली प्रदर्शित झालेल्या ‘कोहराम’ चित्रपटात एकत्र झळकले होते. मात्र, यानंतर हे दोन्ही कलाकार एकत्र चित्रपटात दिसले नाहीत. त्यावेळी त्यांच्यात काही वाद झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र, ही एक अफवा असल्याचे नाना पाटेकर यांनी स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी मैत्रीचे काही किस्सेही शेअर केले आहेत.
अमिताभ हे माझे खूप चांगले मित्र आहेत. ते माझ्यापेक्षा मोठे आहेत पण जेव्हा ते भेटतात तेव्हा ”नानाजी कैसे है आप?”असे विचारतात ते सगळ्यांनाच आदराने बोलतात. एकदा त्यांनी चित्रीकरणावेळी शर्ट घातलेला होता. मला तो शर्ट आवडला आणि मी त्याची प्रशंसा केली. यानंतर मी व्हॅनिटीमध्ये गेलो आणि पाहतो तर काय चक्क हॅंगरला माझ्या शर्टाऐवजी त्यांनी घातलेला शर्ट होता. स्वतःचा शर्ट मला देऊन ते माझा शर्ट घालून गेले होते. अजूनही तो शर्ट माझ्याकडे असल्याचेही ते म्हणाले.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा