बीग बींच्या ‘102 नॉट आऊट’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्या आगामी 102 नॉट आऊट या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज प्रदर्शित झाले. अमिताभ यांनी हे पोस्टर ट्‌विटर अकाऊंटरवरून शेअर केले आहे. पोस्टर सोबतच त्यांनी ”बाप कूल आणि बेटा ओल्ड स्कूल असे गंमतशीर कॅप्शनही दिले आहे.

पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन हे पांढऱ्या दाढीत आजोबांच्या लूकमध्ये दिसत आहेत तर ऋषी कपूर हे एका अंड्यातून बाहेर येताना असताना दिसतात. या चित्रपटात आपल्या 102 वर्षांच्या वडिलांना आणि त्यांच्या खोड्यांना वैतागलेला एक मुलगा दाखवण्यात आला आहे. या वैतागलेल्या मुलाची भूमिका ऋषी यांनी तर त्याच्या वडिलांची भूमिका अमिताभ बच्चन यांनी केली आहे. यापूर्वी चित्रपटाचा एक टीझर प्रदर्शित झाला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)