बीएसएफ जवान प्रसाद बेंद्रे यांच्यावर अंत्यसंस्कार

पुणे – मणिपूर येथे कर्तव्यावर असलेले सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान प्रसाद प्रकाश बेंद्रे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मूळचे पुण्यातील शिवाजीनगर येथील असलेल्या बेंद्रे यांच्यावर रविवारी शहरातील वैकुंठ स्मशानभूमीत भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वैकुंठ स्मशानभूमीत सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना हवेत गोळीबार करून मानवंदना दिली.

बेंद्रे कुटुंबीय शिवाजीनगर गावठाणात पंचमुखी मारुती परिसरात वास्तव्यास आहेत. मणिपूरमध्ये कर्तव्य बजावत असताना शुक्रवारी त्यांचे निधन झाले होते. त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी दिल्लीहून पुण्यात आणण्यात आले. शिवाजीनगर गावठाण येथील राहात्या घरापासून फुलांनी सजविलेल्या ट्रकमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी शहरातील सामाजिक, राजकिय क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रसाद बेंद्रे (27) यांच्या पश्‍चात पत्नी, आई व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. चार वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. प्रसाद यांचा दौंड येथील सायली डहाळे यांच्याशी विवाह झाला होता. जवान बेंद्रे यांचे शिक्षण पुण्यातच झाले. काही महिन्यांपूर्वीपर्यंत ते श्रीनगरमध्ये कार्यरत होते. नुकतीच त्यांची मणिपूर, इम्फाळ येथील चीन सीमेवर बदली झाली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
2 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)