बीएसएफच्या प्रमुखपदी रजनीकांत मिश्रा 

नवी दिल्ली: सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि सशस्र सीमा दलाच्या (एसएसबी) प्रमुखपदी भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) वरिष्ठ अधिकारी रजनीकांत मिश्रा यांची रविवारी नियुक्‍ती करण्यात आली. ते आयपीएसच्या 1984च्या बॅचच्या तुकडीतील उत्तर प्रदेश केडरचे अधिकारी असून बीएसएफचे नवनिर्वाचीत महानिरिक्षक एस. एस. देसवाल यांचे क्‍लासमेट आहेत.
मिश्रा योनी के. के. शर्मा यांच्याकडून पदभार स्विकारला आहे. हा कार्यभार ते पुढील वर्षी ऑगस्टपर्यत सांभाळणार आहेत. याशिवाय आयटीबीपीचे महानिरिक्षक आर. के. पचनंदन हे पुढील महिन्यात सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांच्या जागीही नवीन नियुक्‍ती करण्यात येणार आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)