बीएसएफच्या जवानाचा “आयएसआय’कडून गैरवापर – के.के. शर्मा

नवी दिल्ली,  “बीएसएफ’च्या जवानांसाठीच्या अन्नपदार्थांबाबत सोशल मिडीयावर पोस्ट केलेल्या व्हिडीओचा पाकिस्तानची गुप्तहेर संघटना “आयएसआय’कडून गैरवापर केला गेल्याचा दावा निमलष्करी दलाचे प्रमुख के.के. शर्मा यांनी केला आहे. भारतीय जवानांना निकृष्ठ दर्जाचे अन्न देण्यात येत असल्याचा संदेश “आयएसआय’ने पसरवून भारतीय सैन्याचे मनोधैर्य खच्चीकरण केल्याची टीका शर्मा यांनी केली आहे. “बीएसएफ’चा जवान तेजबहाद्दुर यादवने सोशल मिडीयावर अपलोड केलेल्या कथित व्हिडीओ संदर्भात ते बोलत होते.

“बीएसएफ’चे अतिरिक्‍त महासंचालक म्हणून आपण 2012 साली रुजू झालो. तेंव्हापासून कोणाही जवान अथवा अधिकाऱ्याने निकृष्ठ अन्नाबाबत तक्रार केली नव्हती. बदल्या किंवा नियुक्‍त्यांबाबत नक्कीच नाराजी असू शकते. मात्र तेज बहाद्दुर यादव या जवानाने अन्नाच्या गुणवत्तेबाबत तक्रार केली तेंव्हा आपल्याला धक्काच बसल्याचे के.के. शर्मा यांनी सांगितले.

“बीएसएफ’च्या पाकगृहातील पदार्थांची नियमित तपासणी होते. मात्र यादवने तक्रार केल्यामुळे आम्हापुढे खुले आव्हान उभे राहिले आहे. सीमेवरच्या कोणत्याही चौकीवर कधीही कोणीही जाऊन अन्नपदार्थांची तपासणी करू शकतो. घरच्यासारखेच अन्नपदार्थ तिथे दिले जातात, अशी ग्वाहीही शर्मा यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)