बीएसएनएल टॉवरजवळ वणव्याने आग

बीएसएनएल टॉवरजवळ वणव्याने आग

महाबळेश्वरच्या विल्सन पॉईंटवरील घटना

महाबळेश्वर, दि. 4 (प्रतिनिधी)- येथील सर्वात उंच ठिकाणी असलेल्या विल्सन पॉईंटवरील बीएसएनएलच्या टॉवर जवळ वणव्याने आग लागून या आगील भारत दुरसंचार निगमचे ऑप्टीकल फायबर केबलसाठीचे प्लास्टिक पाईप जळुन खाक झाले.सुदैवाने पालिकेचा अग्नीशामक बंब वेळेवर पोहोचल्याने आग दुरसंचार निगमच्या सेंटर पर्यंत पोहचली नाही.अन्यथा दुरध्वनी व मोबाईल यंत्रणेत बिघाड होउन सेवा खंडीत झाली असती.
विल्सन पॉईंटवर भारत दुरसंचार निगमचा टॉवर व त्याच्या शेजारी सर्व यंत्रणा असलेले सेंटर आहे.हे सेंटर बंदिस्त बांधकामात आहे. या टॉवरशेजारी मोठे मैदान असुन या मैदानावर केबल व त्याचे प्लास्टिक पाईपचे मोठे बंडल आहेत.याच मैदानावर पावसाळ्यात गवत उगवते. हे गवत सध्या वाळले होते.या वाळलेल्या गवताला आग लागली व ही आग हळुहळु सर्व मैदानावर पसरली.या वणव्याने लागलेल्या आगीत दुर संचार निगमचे ऑप्टीकल फायबर केबल साठी लागणारे प्लास्टिकचे पाईप ठेवण्यात आले होते.या पाईपचे काही बंडल या आगीत जळुन खाक झाले.आगीचे काळया धुराचे लोट हवेत पसरले होते.या आगीची खबर पालिकेत कळविण्यात आली.तातडीने अग्नीशामक बंब विल्सन पॉईंटवर पोहचला व आग टॉवर सेंटरकडे पसरत असतानाच प्रथम त्या बाजुकडील आग विझवुन सेंटर आगी पासुन वाचविण्यात आले.पंधरा मिनीटात सर्व मैदानावरील आग एकाच बंबात आटोक्‍यात आली.परंतु तो पर्यंत आगीत प्लास्टिक पाईपचे काही बंडल जळुन खाक झाले होते. आग पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.आगीची खबर मिळताच दुर संचार निगमचे दिपक शिर्के रमेश चव्हाण व बापुराव खोमणे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशामक बंबा बरोबर राजेंद्र मोरे पी. बी. ननावरे आर. बी. पवार व संदीप पवार या कर्मचारी यांनी शर्थीचे प्रयत्न करून कमीत कमी वेळेत आग आटोक्‍यात आणली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाबळेश्वर ः टॉवरजवळ लागलेल्या वणव्यामध्ये भस्मसात झालेले बी.एस.एन.एल.चे प्लॅस्टिक पाईप.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)