बीएसएनएल कर्मचाऱ्याची टेलिफोन वायरने फास लावून आत्महत्या

ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) – बीएसएनएलच्या एका कर्मचाऱ्याने टेलिफोनच्या वायरने फास लावून आत्महत्या केली आहे. येथील ऍग्रीकल्चर कॉलेजच्या फार्महाऊसमधील एका झाडावर त्याने फास लावून घेतला. रामचरण चौहान अशी या कर्मचाऱ्याची ओळख पटली आहे.

ऍग़्रिकल्चर कॉलेज फार्महाऊसमधील एका झाडाला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह लटकत आहे, अशी माहिती गुरुवारी दुपारी गोळा मंदिर पोलीस ठाण्याला कोणीतरी 100वर फोन करून सांगितली. पोलीसांनी तपास केल्यानंतर मृत व्यक्तीची ओळख रामचरण चौहान, निवासी रेशम मिल ओल्ड लाईन अशी पटली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

रामचरण चौहान बीएसएनएलमध्ये लाईनमन म्हणून काम करत होता. त्याची ड्यूटी गोळा मंदिर रोडवर असायची. रोजच्याप्रमाणे ते आजही सकाळी 9 वाजता कामावर गेले होते, असे त्यांच्या मुलाने पोलीसांना सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)