“बीएसएनएल’ने थकविले वीज वितरणचे 12 लाख

वाई तालुक्‍यातील परिस्थिती
वीज वितरणने खंडीत केला वीज पुरवठा
नेटवर्कसह इंटरनेटसेवा कोलमडली

भुईंज, दि. 27 (वार्ताहर) – वाई तालुक्‍यातील बीएसएनएल या दूरसंचार विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या निष्क्रिय कारभारामुळे मोबाईल टॉवरसह टेलिफोन एक्‍सचेंज अशा एकूण 11 कार्यालयांनी वीज मंडळांची सुमारे 12 लाख रुपयांची रक्कम थकविली आहे. यामुळे वीज मंडळाने या कार्यालयांचा वीज पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे नेटवर्कसह इंटरनेट सुविधा बंद पडली आहे.
सविस्तर वृत्त असे, वाई शहरातील गणपती आळी येथील मुख्य कार्यालयातील एक्‍सचेंजची 5 लाख 56 हजार, रविवार पेठ 1 लाख 30 हजार, सोनगीरवाडी 1 लाख 18 हजार तर ग्रामीण भागातील मोबाईल टॉवरसह एक्‍सचेंज पुढील प्रमाणे – ओझर्डे 26 हजार 300 रुपये, पाचवड 30 हजार 800 रुपये, भुईंज 1लाख रुपये, सुरुर 75 हजार 650 रुपये, पसरणी 58 हजार 770 रुपये, जांब 40 हजार 500 रुपये, आसरे 52 हजार रुपये, बावधन 77 हजार 270 रुपये अशा 11 ठिकाणच्या कार्यालयातून अनेक पोस्ट कार्यालये, साखर कारखाने, एसटी महामंडळ, बॅंका, पत संस्था, विकास सेवा, सोसायट्या, प्राथमिक शाळा, महाविद्यालये, पोलिस ठाणे, दवाखाने, सरकारी कार्यालये, निम सरकारी कार्यालये, सेतू कार्यालये अशा विविध संस्थांनी विश्वासाने बीएसएनलची असणारी शाश्‍वत मोबाईल रेंज, लॅन्डलाईन, टेलिफोन, नेटवर्क, इंटरनेटची शाश्‍वत असणारी सुविधा स्वीकारली याचे भान वरीष्ठ अधिकारी विसरुन त्यांनी गेल्या दोन महिन्यापासून वीज मंडळाचे 12 लाख रुपये थकविल्याने त्यांनी त्यांचा विज पुरवठा तोडल्याने गेल्या दोन दिवसांपासून वाई तालुक्‍यातील बीएसएनएलची सर्व सेवा भुईसपाट झाल्याने ती पुन्हा कधी सुरु होईल हे आज तरी सांगणे अवघड आहे. या गलथान कारभारामुळे ग्राहकांमधून संतापाची लाट उसळली आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)