बीएड, एमएड, बीपीएड सीईटीच्या तारखा जाहीर

 

पुणे – उच्च शिक्षण विभागाच्या बीएड, एमएड, बीपीएड, एमपीएड, तीन व पाचवर्षीय विधि अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी घेतले जाते. या सीईटीचा तारखा जाहीर झाल्या असून, त्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन उच्च शिक्षण विभागाने केले आहे.

पाचवर्षीय विधि (लॉ) अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत दि. 26 मार्चपर्यंत आहे. त्याची सीईटी 22 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. एमएड सीईटीसाठी दि.26 मार्च ते 25 एप्रिल या कालावधीत अर्ज करणे आवश्‍यक आहे. ही सीईटी 25 मे रोजी होईल. बीपीएड अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी अर्ज करण्याची मुदत 3 एप्रिल ते 5 मे पर्यंत आहे. त्याची 1 ते 3 जून दरम्यान सीईटी होणार आहे.

बीएड सीईटीसाठी 9 एप्रिल ते 9 मे ही मुदत आहे. एमपीएड सीईटीसाठी 10 एप्रिल ते 10 मे या कालावधीत अर्ज करता येईल. तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी 16 एप्रिल ते 16 मे इतकी मुदत आहे. बीए अथवा बीएसस्सी बीएड या इंटिग्रेडेट अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी 20 एप्रिल ते 15 मे या कालावधीत अर्ज करता येईल, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्‍त आनंद रायते यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)