“बीआरटी’ लेनला धडकून एसटीचा अपघात

पुणे – शिवाजीनगर स्थानकातून सकाळी परळी (जि.बीड) साठी मार्गस्थ झालेल्या एसटीचा नगर रोड “बीआरटी’ मार्गावर किरकोळ अपघात झाला. कारचालकाने पुढे जाण्यासाठी समोरुन गाडी वळवल्याने घाबरलेल्या चालकाने बस उजवीकडे वळवली. यामुळे “बीआरटी’ लेनला एसटी धडकून किरकोळ अपघात झाला. यात कोणीही जखमी झाले नाही.

रविवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास नगर रोड “बीआरटी’ मार्गावरील वडगावशेरी परिसरात हा प्रकार घडला. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे साडेपाच वाजता शिवाजीनगर आगारातून परळी साठी बस मार्गस्थ झाली. वडगाव शेरी परिसरात एका कारचालकाने “ओव्हरटेक’चा प्रयत्न केला. यावेळी काही प्रमाणात कार एसटीसमोर आली. यामुळे घाबरलेल्या चालकाने एसटी नियंत्रणात आणण्यासाठी ती उजवीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. यामुळे शेजारीच असलेल्या “बीआरटी’लेनला एसटी धडकली. रविवार असल्याने मार्गावर वाहनांची गर्दी नव्हती. यामुळे मोठा अपघात टळला. दुपारी क्रेनच्या सहाय्याने एसटी बाहेर काढण्यात आली. एसटीमध्ये चारच प्रवासी होते. ते सर्व सुरक्षित होते, असे प्रशासनाने सांगितले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)