बीआरटी मार्गावर खर्चाचा रतीब

पिंपरी – पीएमपीएमएलच्या बीआरटी मार्गावर महापालिकेकडून विविध कारणास्तव खर्चाचा रतीब सुरुच आहे. आता बर टर्मिनल आणि थांब्यांवर सुरक्षा रक्षक पुरविणे आणि स्वच्छताविषयक कामे करण्यासाठी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकांवर 43 लाख तर स्वच्छतेच्या कामासाठी 3 लाख रूपये खर्च होणार आहेत.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बीआरटी मार्गावर टर्मिनल आणि बस थांबे उभारण्यात आले आहेत. संगमवाडी ते विश्रांतवाडी, येरवडा ते वाघोली, सांगवी फाटा ते किवळे, नाशिक फाटा ते वाकड, निगडी ते दापोडी, मुकाई चौक टर्मिनल, भोसरी टर्मिनल, भक्ती-शक्ती टर्मिनल या मार्गावरील बस थांब्यावर सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी स्वच्छतेचे कामकाजही करावे लागणार आहे. त्यासाठी 1 जानेवारी 2018 रोजी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.

त्यानुसार, पाच ठेकेदारांनी निविदा भरल्या. त्यामध्ये रक्षक सिक्‍युरिटी सर्व्हिसेस ऍण्ड सिस्टीम्स हे ठेकेदार सुरक्षा रक्षक पुरविण्यासाठी पात्र ठरले. त्यांचा प्रति सुरक्षा रक्षक दर 12 हजार 213 रूपये निश्‍चित करण्यात आला. त्यानुसार, एकूण खर्च 43 लाख 23 हजार रूपये होणार आहे. याच बीआरटी मार्गावर स्वच्छतेच्या कामासाठीही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये ऍक्‍टीव्ह सिक्‍युरिटी सव्रहीसेस हे ठेकेदार पात्र ठरले. या स्वच्छतेच्या कामासाठी एकूण 3 लाख 16 हजार रूपये खर्च होणार आहे. या दोन्ही ठेकेदारांना सुरक्षा रक्षक आणि स्वच्छतेच्या कामासाठी कार्यादेश देण्यात आला आहे.

रखवालदार, मदतनीसही “रक्षक’चेच
पीएमपीएमएलचे मुख्य कार्यालय, 13 आगार, विविध बस स्थानके, स्क्रॅपयार्ड, पार्कींगयार्ड आदी महत्त्वाच्या ठिकाणी 150 खासगी रखवालदार मदतनीस तीन वर्षासाठी पुरविण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रीया राबविण्यात आली. त्यानुसार, रक्षक सिक्‍युरिटी सर्व्हिसेस ऍण्ड सिस्टीम्स, सैनिक इंटेलिजन्स ऍण्ड सिक्‍युरिटी आणि जयभवानी इंटरप्रायजेस या तीन ठेकेदारांनी निविदा भरल्या. त्यामध्ये रक्षक सिक्‍युरिटी यांनी सन 2018-19 साठी 14 हजार 389 रूपये, सन 2019-20 साठी 14 हजार 955 रूपये आणि सन 2020-21 साठी 15 हजार 574 रूपये दर सादर केला. इतर ठेकेदारांपेक्षा रक्षक सिक्‍युरिटी यांचे दर लघुत्तम असल्याने त्यांना रखवालदार पुरविण्याचे कामकाज देण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)