बीआरटी मार्गात पुन्हा ‘ब्रेक डाऊन’

पिंपरी – दापोडी ते निगडी दरम्यान बीआरटी मार्गात कासारवाडी येथे बस बंद पडण्याची घटना शुक्रवारी पुन्हा एकदा घडली. त्यामुळे इतर बसला अडथळा निर्माण झाला होता. या मार्गात सतत बस बंद पडत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बीआरटी मार्गात कात्रज ते भोसरी (एमएच 12, केओ 0137) या क्रमांकाची बस बंद पडली होती. बीआरटी मार्गाच्या मध्यभागी बस बंद पडल्याने इतर बस वाहतूक अन्य वाहनांच्या रस्त्याने वळविण्यात आली. यामुळे खासगी वाहनांसाठी वापरण्यात येणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पीएमपीएमएलच्या बस बंद पडण्याचे प्रकार वाढत असल्याने प्रवाशांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे. या घटना सतत घडत असल्याने दोनच दिवसापूर्वी पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी बीआरटी मार्गाची पाहणी करत बस सेवा सुधारण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, निगडी-दापोडी मार्गावर रोज बस “ब्रेक डाऊन’ होताना दिसत आहे. पीएमपीएमएलच्या काही बस कंत्राटी पध्दतीने चालवायला देण्यात आल्या असून त्या बस बहुतांशी प्रमाणात बंद पडण्याचे प्रमाण जास्त आहे.

आपण शिवाजीनगर ते पिंपरी दरम्यान रोज प्रवास करतो. बीआरटी मार्ग चालू केल्याने जलदगतीने प्रवास होत आहे. मात्र, एखादी बस या मार्गातच बंद पडल्यास इतर बस वाहतुकीवर परिणाम होत आहे. यामुळे प्रशासनाने प्रवाशांच्या सेवेसाठी सुस्थितीतील बस उपलब्ध करणे गरजेचे असल्याचे, प्रवासी ज्योतीराम माळवदे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)