बीआरटी मार्गात खासगी वाहनांची घुसखोरी

पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) जलद बस सेवेसाठी राखीव असलेल्या बीआरटी बस मार्गावर मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत आहे. घुसखोरी करणाऱ्या वाहनांना अटकाव करण्यासाठी त्या वाहनांना जप्त करण्यात येवून विक्री करण्यात येईल, असा इशारा तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी दिला होता. मात्र त्यांच्या बदली नंतर प्रशासनाचा वचक कमी झाल्याने खासगी वाहनांची घुसखोरी वाढली आहे.

घुसखोरी सुरु असल्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. शहरातील नागरिकांना जलद गतीने प्रवास व्हावा म्हणून बीआरटी रस्त्यांची निर्मिती करण्यात आली. बीआरटीच्या रस्त्यावरुन फक्त पीएमपीच्या बस आणि रुग्णवाहिकाच धावू शकतात. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून खासगी वाहन चालकांनी बीआरटी मार्गावरुनच गाड्या दामटायला सुरवात केल्याचे चित्र सर्व शहरात दिसत आहे. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सध्या सांगवी फाटा ते किवळे-मुकाई चौक या बीआरटी मार्गावर 118 बस धावत असून त्यांच्या 17 वेगळ्या मार्गावर बाराशे 28 फेऱ्या होतात. तर दुसरा नाशिकफाटा ते वाकड या मार्गावर 15 बस दोन वेगवेगळ्या मार्गावर धावतात. त्यांच्या 180 फेऱ्या दररोज होतात. साईड रस्त्यांवरील होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे खासगी चारचाकी वाहने सर्रास बीआरटी राखीव मार्गावरुन धावतात. त्यामुळे अपघात होण्याची भिती आहे.

पीएमपीएमएल प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे बीआरटीच्या मार्गावर पीएमपीच्या बस कमी आणि खासगी वाहनेच जास्त प्रवास करत असल्याचे पहायला मिळत आहे. काही बीआरटी मार्गावर वार्डन दिसतात तर बहुतांश मार्गावर खासगी वाहनांना रोखण्याकरीता कुठल्याही प्रकारची यंत्रणा उपलब्ध नाही, अशी वाईट परिस्थिती आहे. पीएमपीच्या भोंगळ कारभारामुळे अनेक दुचाकीस्वार आणि नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रवास सुखकर आणि जलद व्हावा या दृष्टीकोनातून बीआरटी मार्गाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र आता हीच बीआरटी नागरिकांसाठी डोकेदुखी आणि अपघाताचे ठिकाण झाले आहे. यावर प्रशासन कधी गांभिर्याने लक्ष देणार, असा प्रश्‍न प्रवासी करत आहेत.

खासगी वाहनांचा वावर वाढल्याने बीआरटी मार्गावरुन प्रवास करताना जीव धोक्‍यात घेऊन प्रवास करावा लागतो. सिग्नलच्या ठिकाणी कधी कुठले वाहन येवून धडकेल याची शाश्‍वती नाही. ज्या बीआरटी मार्गावर बससेवा सुरु केली आहे. त्या मार्गातून धावणाऱ्या खासगी वाहनांवर पीएमपीएमएल प्रशासनाने कारवाई करावी. त्यामुळे बीआरटीचा प्रवास सुखकर व सुरक्षित होईल.
– अनिकेत गायकवाड, प्रवासी युवक.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)