बीआरटी मार्गात खासगी वाहनांचा सुळसुळाट

पिंपरी – प्रवाशांना जलद गतीने प्रवास करता यावा याकरीता बीआरटी मार्गाची निर्मिती करोडो रुपये खर्च करुन करण्यात आली. तब्बल नऊ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अखेर काही दिवसांपूर्वी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते निगडी या मार्गावर बीआरटी बस सेवा सुरु करण्यात आली. मात्र बीआरटी मार्गात खासगी वाहनांचा सुळसुळाट असल्याने बीआरटी मार्गातील बसेसला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.

बीआरटी मार्गातून धावणाऱ्या खासगी वाहनांवर 12 सप्टेंबरपासून कारवाई होणार असे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाने जाहीर केले आहे. मात्र सध्या कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने किंवा समज देण्यात येत नसल्याने खासगी वाहने खुलेआम बीआरटी मार्गावरुन धावत आहेत. या सर्व वाहनांवर वाहतूक पोलीस कुठलीही कारवाई करत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्याचा फटका बीआरटी मार्गावरुन धावणाऱ्या पीएमपी बसला बसत असून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे व बसचा वेग मंदावत असून बीआरटी मार्गाच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.
बीआरटी मार्गातून फक्त रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने, पोलीस वाहने आदी वाहनांना प्रवेश देण्यात आला असून अन्य कुठलेही वाहने बीआरटी मार्गात प्रवेश केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे व दंड केला जाणार आहे. मात्र नियम तोडण्याची सवय लागलेल्या चालकांना लगाम बसावा यासाठी कारवाईची मागणी होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)