“बीआरटी’ ई-बस शहरात दाखल

आजपासून शहरात चाचणी : ओलेक्‍ट्रा कंपनीची बस

पुणे – शहरात पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी येऊ घातलेल्या एका इलेक्‍ट्रिक बसेसची ट्रायल नुकतीच पार पडली. 9 मीटर लांबीची ही बस होती. यानंतर आता बीआरटी मार्गावरून धावणारी 12 मीटर लांबीची ई-बस देखील दाखल झाली असून आजपासूनच (दि.4) या बसची ट्रायल होणार आहे, अशी माहिती पीएमपीतील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

-Ads-

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात पाचशे वातानूकुलीत ई-बस भाडेकराराने घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. यानुसार सुरवातीच्या टप्प्यात 150 ई-बसेस खरेदी करण्याचे नियोजन असून यासाठीच्या निविदेला मान्यता देण्यात आली आहे. यात 9 मीटर लांबीच्या 25 तर 12 मीटर लांबीच्या 125 वातानूकुलीत बसेसचा समावेश आहे. यातील 12 मीटर लांबीच्या बस या बीआरटी मार्गावर धावण्यासाठी असणार आहेत. दरम्यान, यापुर्वी ओलेक्‍ट्रा कंपनीच्या (9 मीटर) बसची चाचणी घेण्यात आली आहे. यानंतर आता बीआरटी मार्गावर धावणाऱ्या (12 मीटर) बसची ट्रायल घेण्यात येणार असून ही बसदेखील शहरात दाखल झाली आहे. नव्याने दाखल झालेली बस ही ओलेक्‍ट्रा याच कंपनीची असून आजपासून ट्रायल घेतील जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

टाटा कंपनीचीही बस येणार
बीआरटी मार्गावर धावणाऱ्या 12 मीटर लांबीच्या ई-बससाठी ओलेक्‍ट्रा (बीवायडी) आणि टाटा या दोन कंपनीच्या निवीदा आल्या आहेत. यातील ओलेक्‍ट्रा या कंपनीची बस दाखल झाली आहे. तर, येत्या चार ते पाच दिवसांत टाटा कंपनीची ई-बस देखील दाखल होणार असून यानंतर त्याची चाचणी घेण्यात येईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup: Thumbs up
2 :heart: Love
1 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
1 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)