बीआरटीवर “वॉच’ ठेवणार “तिसरा डोळा’

पिंपरी – दोन महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या दापोडी-निगडी बीआरटी मार्गावरील खासगी वाहने रोखताना वाहतूक पोलीस व पीएमपीएमएल प्रशासनाच्या “नाकी नऊ’ येत आहेत. ही घुसखोरी रोखण्यासाठी सीसीटीव्हीची मदत घतली जाणार असून, त्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार दापोडी ते निगडी मार्गावरील पहिल्या टप्प्यात बस स्थानकावर कॅमेरे बसवण्यात येणार असून, ते काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

यासंदर्भात महापालिका, बीआरटी, वाहतूक शाखा, पीएमपीचे अधिकारी आणि पवई आयआयटीचे अधिकारी यांची नुकतीच बैठक झाली पार पडली. यावेळी सह शहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे, उप अभियंता दीपक पाटील, पीएमपीचे पिंपरी-चिंचवडचे मुख्य समन्वयक संतोष माने तसेच, पिंपरी, भोसरी, चिंचवड आणि निगडी वाहतूक शाखेचे अधिकारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात बीआरटीस आणि पीएमपीच्या नियोजनावर अधिकाऱ्यांनी मत मांडले आहे. त्यात सद्यस्थितीत बीआरटी मार्गांना प्रतिसाद चांगला असल्याचे पीएमपी अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, खासगी वाहनांची घुसखोरी थांबवण्यास सपशेल अपयश येत आहे. बीआरटी मार्गावर नेमलेल्या सुरक्षा रक्षकांना कुणीही जुमानत नसल्याने वाहतूक शाखेकडून त्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

खासगी वाहनांना रोखण्यासाठी सुरक्षा रक्षक नेमले आहेत. मात्र त्यांना कोणी जुमानत नाही. वाहतूक शाखेकडून केल्या जाणाऱ्या कारवाईत सातत्य नसल्याने मार्गात घुसखोरी करणाऱ्यांवर वचक निर्माण होत नाही. त्यावर वाहतूक शाखेने त्या मार्गावर कॅमेरे बसवण्याचा मुद्दा या बैठकीत उपस्थित केला आहे. महापालिकेनेही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने या मार्गावर कॅमेरे बसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कॅमेऱ्याद्वारे खासगी वाहनांवर कारवाई करणे वाहतूक शाखेला सोपे जाणार असल्याने कॅमेरे लवकरच कार्यन्वित होणार असल्याची माहिती महापालिका बीआरटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याबाबत बीआरटी विभागाकडून महापालिकेच्या विद्युत विभागाला पत्रही पाठवण्यात आले आहे. दरम्यान, पवई आयआयटीमार्फत या मार्गाचा अभ्यास करुन आणखी काही त्रुटी दूर करण्यात येणार आहे. त्याचे ऑडीट केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)