बीआरटी’वर बस पुरविण्यास पीएमपी असमर्थ

पिंपरी- पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण पाच बीआरटीएस मार्गांवर सुरु असलेली बससेवा पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाकडे पुरेशा बस उपलब्ध नाहीत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील दोन बीआरटीएस मार्गांवर ही बससेवा सुरु करण्यास असमर्थ असल्याची धक्कादायक कबुली पीएमपीएमएल प्रशासनाने दिली आहे. अन्य मार्गांवरदेखील ही सेवा पूर्ण क्षमेतेने चालविण्यासाठी एकूण 565 अधिक बसची आवशक्‍यता असल्याची बाब पिंपरी महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता व आळंदी बोपखेल या दोन प्रस्तावित मार्गांवर ही बस सेवा सुरु केली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील दुचाकींची संख्या व सातत्याने होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता, सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पीएमपीएमएलच्या वतीने पुण्यातील दोन तर पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण पाच मार्गांवर बीआरटीएस सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये विविध मार्गांवरील 83 बस मार्गांचा समावेश आहे. यामध्ये पुण्यातील संगमवाडी ते विश्रांतवाडी आणि येरवडा ते वाघोली या दोन मार्गांचा समावेश आहे. तर सांगवी फाटा ते मुकाई चौक किवळे, नाशिक फाटा ते वाकड आणि दापोडी ते निगडी या दोन मार्गांचा समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी महापालिकेच्या वतीने शहरात तीन बीआरटीएस बससेवा सुरू करण्यात आली आहे. याशिवाय दोन मार्गांची बहुतांशी काम पूर्ण झाले असून, महापौर राहुल जाधव यांनी दोनच दिवसांपूर्वी काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता व बोपखेल-आळंदी या बीआरटीएस मार्गांची पाहण किरत, या मार्गांवर बस उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या आहेत. पीएमपीएमएलला एकूण पाच बीआरटी मार्गावर संचलनासाठी 568 बसेसची आवश्‍यकता आहे. दैनंदिन सरासरी केवळ 425 बसेसच बीआरटी संचलानकरिता उपलब्ध होत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटी संचलन हे पूर्ण नियोजनानुसार करणे शक्‍य होत नाही. पीएमपीएमएलकडे सध्या बीआरटी संचलनाकरिता उपलब्ध बसपैकी महामंडळाच्या आणि भाडेतत्वावरील अशा एकूण 43 टक्के बसेसच उपलब्ध होत आहेत. उर्वरित 57 टक्के बस या नॉन बीआरटी मार्गावर तांत्रिक अडचणीमुळे संचलन केल्या जात आहेत.

पिंपरी महापालिकेमार्फत नव्याने काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता चिखली आळंदी ते बोपखेल हे बीआरटी मार्ग निर्माणाधीन असून नजीकच्या काळात संचलनासाठी उपलब्ध होणार आहेत. काळेवाडी फाटा ते चिखली मार्गावर बससेवा सुरु नाही. या मार्गावर 15 मिनिटांच्या फरकाने किमान 15 बसेसचे संचलन करावे लागणार आहे. त्याचबरोबर आळंदी ते बोपखेल या मार्गावर सध्या महामंडळातर्फे 22 बस मार्गांच्या 78 साध्या बस बसेसचे संचलन सुरु आहे. भविष्यात हा मार्ग बीआरटी मार्ग होणार आहे. त्यासाठी मार्गावर सध्या चालू असलेल्या 78 आणि 9 अशा 96 तर काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता या मार्गावरील 10 टक्के राखीव बसेस धरुन 17 बस आणि विविध बीआरटी मार्गावर चालू असलेल्या 910 अशा एकूण 1103 बीआरटी बसची महामंडळाला आवश्‍यकता आहे.

सध्याच्या 990 बसेसपैकी बीआरटी संचलनासाठी केवळ 425 बस उपलब्ध होत आहेत. त्यामुळे बीआरटी संचलानासाठी महामंडळाला आणखीन बसेसची आवश्‍यकता आहे. त्यानंतरच नवीन सुरु होणा-या मार्गीकांवर बस संचलन करणे महामंडळास शक्‍य होणार आहे. सद्य:स्थितीत महामंडळ नवीन बीआरटी बस मार्गावर संचलन करण्यास असमर्थ असल्याचे, महामंडळाने महापालिकेला कळविले आहे.

पुणे व पिंपरी -चिंचवड शहरातील बीआरटीएस मार्ग व बसची संख्या
मार्ग                                        एकूण मार्ग                 एकूण बस संख्या
1) संगमवाडी ते येरवडा                   09                            67
2) येरवडा ते वाघोली                       19                          151
3) सांगवीफाटा ते मुकाई चौक किवळे     15                        115
4) नाशिक फाटा ते वाकड                   02                          15
5)े दापोडी ते निगडी                         38                       220
एकूण मार्ग                                     83                       586

पीएमपीएमएल ताफ्यातील बसची संख्या            एकूण बस               उपलब्ध बस
1) पीएमपीएमएल मालकीच्या बस                         337                      168
2) भाडेतत्त्वावरील बस                                        653                      257
     एकूण                                                      990                       425

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)