बीआरटीतील घुसखोरी रोखणाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर

पिंपरी – दापोडी ते निगडी दरम्यान दोन महिन्यापूर्वी बीआरटी मार्ग सुरु करण्यात आला. मात्र, या मार्गात खासगी वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी 90 माजी सैनिकांना सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्यात आलेले आहे. देशाची सेवा करुन आलेले जवान बीआरटी मार्गात खासगी वाहनांचा शिरकाव होऊ न देण्याची कामगिरी चोख पद्धतीने बजावत आहेत. मात्र, या जवानांची सुविधेअभावी गैरसोय होत आहे. बीआरटी मार्गात जवानांना बसायला खुर्ची नाही, ऊन-पावसापासून संरक्षणासाठी छत नाही, वाहने आडवण्यासाठी हातात तुटलेली दोरी या अवस्थेत जवानांना सेवा बजवावी लागत आहेत.

बीआरटी मार्गात निगडी ते दापोडी दरम्यान ठिक-ठिकाणी बस थांबे उभारण्यात आलेले आहेत. याच मार्गावर वाहनचालक बीआरटी मार्गात शिरुन जलद प्रवासी वाहतूकीला अडथळा निर्माण करत आहेत. या मार्गात माजी सैनिकांना सुरक्षारक्षक नेमण्यात आल्याने वाहनचालकांवर जरब बसत आहे. देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून संरक्षण करणारे जवान देशांतर्गत नागरिकांना शिस्त लावण्यासाठी धडपडत आहेत. निगडी ते दापोडी मार्गात सद्यस्थितीत 90 माजी सैनिक कार्यरत असून सकाळी 6.30 ते रात्री 10.30 या वेळेत काम करत आहेत. मात्र, काही खासगी वाहनचालक बीआरटी मार्गात शिरुन बसला अडथळा निर्माण करत असल्याचे दिसून येत आहे.

-Ads-

निगडी ते दापोडी मार्गात बीआरटी मार्गातील प्रवास सुखकर व जलद होण्यासाठी माजी सैनिक चोख व्यवस्था बजावत आहेत. मात्र, देशाची सेवा करणारे माजी सैनिक गैरसोयीच्या विळख्यात अडकलेले आहेत. गेल्या दोन महिन्यापासून त्यांना तैनात करण्यात आले आहे. त्या दरम्यान पावसाचे दिवस असूनही भर पावसात भिजत उभे असल्याचेही दिसत होते. सध्या, “ऑक्‍टोबर हिट’ सुरु झाली असून या परिस्थितीतही सुरक्षा रक्षक सेवा बजावत आहेत. या मार्गात स्थानिक वाहनचालक मोठ्या प्रमाणात घुसखोरी करत आहेत. या वाहनचालकांवर जरब बसविण्यासाठी वाहतूक पोलिसांनीही कारवाई करण्याची आवश्‍यकता आहे. याचबरोबर, देशाच्या संरक्षणासाठी हयात घालविलेले जवान समस्यांचा सामना करताना दिसत आहेत. या जवानांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची जबाबदारी पीएमपीएल व महापालिकेची आहे.

बीआरटी मार्गात मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या मार्गात स्थानिक वाहन चालक मोठ्या प्रमाणात घुसखोरी करुन वाद घालण्याचा प्रयत्न करतात. तसेच, बीआरटी मार्गात बॅरीकेटस, रात्रीच्या सुमारास वाहन चालकांना दिसण्यासाठी चमकणारा दोर आदींची आवश्‍यकता असल्याचे, निवृत्त सुभेदार मेजर यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले.

आवश्‍यक उपाय योजना
– बीआरटी मार्गासाठी बॅरीकेटस
– बसण्यासाठी खुर्ची
– अंधारात चमकणारे रेडियमचे दोर
– निवाऱ्यासाठी छत
– पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

या जवानांच्या सुविधा पुरविण्याची जबाबदारी पिंपरी-चिंचवड महापालिकेची आहे. याबाबत, महापालिकेच्या प्रशासन विभागाशी चर्चा करुन माजी सैनिकांना योग्य सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करणार आहे.
– नयना गुंडे, व्यवस्थापिका व अध्यक्षा, पीएमपीएमएल.

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)