“बीआरटीएस सेफ्टी’ ऑडिटसाठी “आयआयटी’ला 27 लाख रुपये

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दापोडी-निगडी या साडेबारा किलोमीटर “बीआरटीएस’ मार्गावर बससेवा सुरू केली आहे. या मार्गाचे “आयआयटी’ पवईकडून “सेफ्टी ऑडिट’ करुन घेण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानुसार तीन टप्प्यात 27 लाख रुपये फी देण्याच्या ऐनवेळच्या प्रस्तावाला स्थायीने मान्यता दिली आहे. बुधवारी (दि.5) पार पडलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी सभापती ममता गायकवाड होत्या.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दापोडी-निगडी या मार्गावर बीआरटीएस सेवा सुरू केली आहे. मात्र, यामुळे प्रवाशांच्या जीवीतास धोका असल्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या अधारे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, महापालिकेच्या वतीने या मार्गावर ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही सेवा पुरवत असतानाच मार्गाचे एका महिन्यात याशिवाय तीन वर्षांत सहा महिन्यांतून एकदा हे “सेफ्टी ऑडिट’ केले जाणार आहे. मात्र, पहिल्या ऑडिडचा अहवाल दोन महिन्यांनंतर उच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे.

याबाबत महापालिकेने विचारणा केली असता, आयआयटी पवई समस्थेने एकून 39 लाख रुपये खर्च सांगितला होता. मात्र, ही रक्कम अधिक असून, महापालिकेच्या वतीने सार्वजनिक हितासाठी हा उपक्रम राबविाल जात असल्याने, फी रक्कम कमी करण्याची मागणी महापालिका प्रशासनाने केली होती. यासंदर्भात आयआयटी पवईचे प्रा. वेदगिरी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही रक्कम 27 लाख करण्यात आली आहे. सुरुवातीला अर्धी रक्कम व त्यानंतर सहा आणि दहा महिन्यांच्या कालावधीनंतर प्रत्येकी 25 टक्के रक्कम अशी एकूण तीन टप्प्यांत ही रक्कम अदा केली जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)