बीआरटीएस कॉरिडॉरमध्ये गंजलेल्या बॅरीकेडस्‌चा वापर

पिंपरी – महापालिकेच्या वतीने काळेवाडी देहू आळंदी व्हाया एम्पायर इस्टेट डेडीकेट लेनमध्ये गंजलेले जुने बॅरीकेटसचा वापर करण्यात येत असल्याची तक्रार विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे पुराव्यादाखल त्यांनी घटनास्थळी भेट देत, महापालिकेच्या कारभारातील त्रुटी समोर आणल्या आहेत. याला जबाबदार असलेला ठेकेदार व त्याला पाठि घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने एम्पायर इस्टेट पुल सुरु करण्यात आल आहे. त्यावरुन काळेवाडी ते देहू-आळंदी बीआरटीएस कॉरिडॉरचे काम सुरु करण्यात आले आहे. हा मार्ग व्हाया एम्पायर इस्टेट मार्गे सुरु करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याकरिता बीआरटीएस कॉरिडॉर सुरक्षित करण्याच्या दृष्टीने या कॉरिडॉच्या बाजूने बॅरिकेडस्‌ उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. एम्पायर इस्टेट पुलाचा ठेकेदार असलेल्या गॅमन इंडीयाची आर्थिक स्थिती ढासळल्याने हा पूल अनेक वर्षे रखडला होता. मात्र, “दादा-बाबा’ करून या ठेकेदाराकडून या पुलाचे काम पूर्ण करुन घेण्यात महापालिका प्रशासनाला यश आले आहे.

-Ads-

दरम्यान, याच मार्गावर ऑटो क्‍लस्टरजवळील एका कंपनीचे स्थलांतर रखडल्यानेया मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. तरीदेखील याठिकाणचा भाग वगळून या मार्गावर बीारटीएस सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळेच घाइघाईने हे काम पूर्ण करण्यावर महापालिकेच्या बीआरटीएस विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, ताताडीने कामपूर्ण करण्याच्या नादात ठेकेदाराकडून तांत्रिक निकष पूर्ण न करणारे, गंजलेले जुने बॅरीकेडस्‌ लावले जात असल्याची माहिती मिळाल्याने विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी याठिकाणी भेट देत, ही बाब समोर आणली आहे. ही बाब समजातच याठिकाणी दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनीदेखील या कामाची पाहणी केली आहे.

बीआरटीएस मार्गाकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. मात्र. हे काम निकृष्ट दर्जाच्या वस्तु करुन कले जात आहे. ही बाब बीआरटीएस विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणुन दिली आहे. आता महापालिका आयुक्तांकडे याची तक्रार केली आहे. शहरातील नागरिकांच्या जीवाशी महापालिका प्रशासनाने खेळू नये, अशी आमची मागणी आहे.
दत्ता साने, विरोधी पक्षनेते

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)