बिहार लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीच्या घरावर सीबीआयचे छापे

मुझफ्फरपूर, (बिहार) – महिला आश्रमातील मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी ब्रिजेश ठाकूर या व्यक्‍तीच्या घरावर सीबीआयने छापे घातले आणि फॉरेन्सिक तज्ञांच्या मदतीने घरात कसून तपासणी केली. ब्रिजेश ठाकूरच्या घरातून काही कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आली असून काही निकटवर्तीयांची चौकशीही करण्यात आली आहे.
सीबीआयचे महानिरीक्षक अभय कुमार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हे छापे घातले.

यावेळी सशस्त्र कमांडोही सहभागी करून घेतले होते. मुझफ्फरपूरमधील साधू रोडवर ठाकूर याच्या मालकीचा महिला आश्रम आणि एका हिंदी दैनिकाचे कार्यालय आहे. ठाकूरच्या घर आणि या दैनिकाच्या कार्यालयाच्या आवारात घुसताच कमांडोंनी आतून प्रवेशद्वार बंद करून घेतली आणि प्रसार माध्यमांचा प्रवेश रोखला. आश्रमाला ठोकलेले सील उघडून काही कागदात्रे आणि अन्य वस्तूही तपासणीसाठी बरोबर घेण्यात आल्या आहेत. ठाकूरचा मुलगा राहुल आनंदचीही चौकशी सीबीआयने केल्याचे समजते आहे.

या महिला आश्रमातील मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्यावर बिहार सरकारने संस्थेची नोंदणी रद्द केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)