बिहार राज्यपालपदाचा कोविंद यांच्याकडून राजीनामा

नवी दिल्ली, दि.20 -बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी आज पदाचा राजीनामा दिला. एनडीए या केंद्रातील सत्तारूढ आघाडीने राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केल्याने ते राज्यपाल पदावरून पायउतार झाले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती राष्ट्रपती भवनकडून देण्यात आली. कोविंद यांच्या राजीनाम्यामुळे पश्‍चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे बिहारचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. राष्ट्रपती मुखर्जी यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ 24 जुलैला समाप्त होणार आहे. त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी निश्‍चित करण्यासाठी 17 जुलैला निवडणूक होणार आहे. त्यासाठी सोमवारी एनडीएचे उमेदवार म्हणून भाजपने कोविंद यांच्या नावाची घोषणा केली. दलित नेते असणाऱ्या कोविंद यांनी दोनवेळा भाजपचे राज्यसभा सदस्य म्हणून कार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)