बिहार, पश्चिम बंगालसह पूर्व भारतात भूकंपाचे तीव्र झटके  

पाटणा –  बिहार, पश्चिम बंगालसह पूर्व भारतातील काही  भागांमध्ये आज भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. हे धक्के एवढे तीव्र होते कि, नागरिकांनी सुरक्षेसाठी घराबाहेर धाव घेतली. दरम्यान, कोणत्याही मालमत्ता अथवा जीवितहानीचे झाली नसल्याचे समजते आहे.

बिहारच्या पूर्णिया, अररिया, कटिहार, कुचबिहार, किशनगंज आणि पाटणामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. तर पश्चिम बंगालमध्ये जलपैगुडी आणि अन्य काही परिसरात आणि नागालँड व मणिपूरमध्येही भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. आज सकाळी सव्वादहाच्या सुमारास २५ ते ३० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवत होते. या भूकंपाचे केंद्र बांग्लादेशच्या रंगपूरमध्ये असून याची तीव्रता ५.०५ एवढी रिश्टर स्केलवर नोंदविण्यात आली आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मिरमध्येही आज सकाळी सव्वापाच वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)