बिहार-उत्तर प्रदेशासारख्या राज्यांमुळे भारत मागे – नीती आयोग

नवी दिल्ली – बिहार-उत्तर प्रदेश, छत्तीसगड अशा राज्यांमुळे भारत मागे पडत असल्याचे मत नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी व्यक्त केले आहे. आपल्या देशातील दक्षिणेकडील आणि पश्‍चिमेतील राज्य वेगाने प्रगती करत आहेत. मात्र बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड यांसारख्या राज्यांमुळेच देश मागे पडला आहे असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. जामिया मिलिया इस्लामिया विश्‍वविद्यालयामध्ये अब्दुल गफार खान स्मारक व्याख्यानमालेत ते बोलत होते.

व्यापार-व्यवसायातील सुलभतेबाबत आपण वेगाने प्रगती केली असली, तरी सामाजिक निर्देशांकाबाबत मात्र आपण अजूनही मागेच आहोत असे अमिताभ कांत यांनी म्हटले आहे. मानव विकास सूचकांकामध्ये 188 देशांमध्ये आपण 133 व्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

-Ads-

भारताच्या परिवर्तनातील आव्हाने या विषयावर बोलताना अमिताभ कांत यांनी सांगितले की, देशाच्या दक्षिण आणि पश्‍चिम भागातील राज्यांची फार चांगली कामगिरी होत आहे. ही राज्ये वेगाने प्रगती करत आहेत. मानव विकास सूचकांकामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला सामाजिक सुधारणांवर भर देणे आवश्‍यक आहे. आकांक्षा जिल्हा कार्यक्रमाद्वारे याच दृष्टीने काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)