बिहारी राजकारण्याचा मुलगा रॉकी यादव मनुष्यहत्या आरोपात दोषी

पाटणा (बिहार)-येथील न्यायालयाने मुलगा रॉकी यादव मनुष्यहत्या आरोपात दोषी असल्याचा निर्णय दिला आहे. आदित्य सचदेव नावाच्या एका 19 वर्षाच्या युवकाची गोळी घालून हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप होता. रॉकी यादवची आई मनोरमा देवी ही जनता दल (यु.)ची एक नेता होती. मात्र हत्या प्रकरणानंतर तिला मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जेडीयूमधून निलंबित केले होते. रॉकीचे वडील बिंदी यादव हे एक बडे व्यापारी असून रॉकीला वाचविण्यासाठी पुरावा नष्ट करण्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.

ही मे महिन्यातील घटना आहे. 12 वीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आदित्य सचदेव आपल्या चार मित्रांसह सेलिब्रेट करण्यासाठी निघाला होता. लॅंड रोव्हरमधून जात असलेल्या रॉकी यादवला त्यांनी “ओव्हरटेक’ केले. त्यामुळे संतापलेल्या रॉकी यादवने अगोदर एक गोळी हवेत मारली आणि नंतर दुसरी गोळी आदित्यला मारली. गाडीच्या मागच्या काचेतून घुसलेली गोळी आदित्यला लागली. आदित्य जागेवरच मरण पावला. रॉकीला 11 मे रोजी अटक करण्यात आली होती, परंतु तो ऑक्‍टोबर महिन्यात जामीनावर सुटला होता. पाटणा उच्च न्यायालयाने दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे रॉकीला पोलीसांना शरण याचे लागले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)