बिहारमध्ये 24 पासून शिक्षक संघाचे द्विवार्षिक महाअधिवेशन

टाकळी हाजी- अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे 28 वे द्विवार्षिक महाअधिवेशन दि. 24 व 25 नोंव्हेंबर रोजी बिहार राज्यातील बौद्धगया
येथे होणार आहे. अधिवेशनास राज्य शासनाकडून 6 दिवस विशेष नैमित्तिक रजा दि.22 ते 27 अखेर मंजूर करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या पुणे जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव वाळके यांनी दिली.
अधिवेशनास पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार मार्गदर्शन करणार आहेत. त्यावेळी संघटनेच्या वतीने प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत. 2005 नंतर नोकरीत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षणाचे व्यावसायिकीकरण करणे व खासगीकरण बंद करावे, सहाव्या वेतन आयोगाच्या त्रुटी दूर करून सातवा वेतन आयोग लागू करावा, शिक्षकांचे व शिक्षणाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी स्वतंत्र शिक्षण आयोगाची स्थापना करावी, शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करावे, शिक्षण अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, ए्‌कूण उत्पन्नाच्या 6 टक्‍के शिक्षणावर खर्च करावा, तो वाढवत नेऊन 10 टक्‍के करावे, शिक्षण सेवक पद्धत बंद करावी, नियमित शिक्षकांची नियुक्‍ती करावी, प्राथमिक शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करावे, आदी प्रमुख मागण्या अधिवेशनात करण्यात येणार आहेत. अधिवेशनात एनसीआरटीचे नामवंत शिक्षणतज्ज्ञ आणि जागतिक शिक्षक संघाचे कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मलेशियासह अन्य देशातील प्रतिनिधि उपस्थित राहणार आहेत. तरी पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखेचे सरचिटणीस सुभाष मोहरे यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)