बिहारमध्ये फटाक्‍यांच्या कारखान्यातील स्फोटात 5 जणांचा मृत्यू

पाटणा – बिहारमध्ये फटाक्‍यांच्या एका अवैध कारखान्यात स्फोट होऊन 5 जण मृत्युमुखी पडले, तर 18 जखमी झाले. मृतांमध्ये दोन बालिका, एक बालक आणि एका महिलेचा समावेश आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे.

नालंदा जिल्ह्यातील बिहारशरीफमध्ये असणाऱ्या दाटीवाटीच्या निवासी भागातील एका घरातच फटाक्‍यांचा कारखाना चालवला जात होता. तिथे गुरूवारी रात्री स्फोट झाला. स्फोटानंतर ज्वालाग्राही पदार्थांच्या मोठ्या साठ्याने पेट घेऊन घराला आग लागली. आग आटोक्‍यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला काही तास शर्थीची झुंज द्यावी लागली. संबंधित घरात भाडेकरू म्हणून राहणारी व्यक्ती तिथूनच अवैध फटाका कारखाना चालवत होती. मृतांमध्ये या भाडेकरूच्याच कुटूंबातील चार सदस्यांचा समावेश आहे. फटाका कारखाना चालवणारा भाडेकरूही स्फोटात जखमी झाला.

त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, स्फोटातील जीवितहानीबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दु:ख व्यक्त केले. स्फोट नेमका कशामुळे झाला ते समजू शकले नाही. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)