बिहारमध्ये पोलीस वाहन व ट्रक टकरीत 1 पोलीस ठार 15 जखमी

नवादा (बिहार) – एक पोलीस वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण टकरीत 1 पोलीस ठार आणि 15 जण जखमी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. नवादा जिल्ह्यातील रजौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत करीगाव येथे सोमवारी रात्री ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात आलेले आहे.

सोमवारी रात्री करीगाव येथे पोलीसांच्या वाहनाला बेकाबू झालेल्या एका ट्रकने जोरदार धडक दिली. या टकरीत एका पोलीसाचा जाग़ीच मृत्यू झाला, तर 15 पोलीस जखमी झाले. हे सर्व पोलीस रजौली मिरव्वणुकीसाठीची आपली ड्यूटी संपवून परत येत होते. जखमी पोलीसांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अपघात झाल्यानंतर वरिष्ठ अधिकारी मेजर रामेश्‍वर सिंह यांना कळवण्यासाठी फोन केला होता, परंतु त्यांनी फोन घेतला नाही, अशी तक्रार पोलीसांनी केली आहे. जर त्यांनी फोन घेतला असता, तर वेळीच उपचार मिळून मरण पावलेल्या पोलीसाचे प्राण वाचू शकले असते, असे त्यांचे म्हणणे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)