बिहारमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची जाळून हत्या

कतिहार (बिहार)  – बिहारमध्ये मालमत्तेच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांची जाळून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडल आहे. बिहारमधील कतिहार जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

केदारनाथ (वय 45), त्यांची पत्नी प्रतिमा देवी (वय 40) आणि या दांपत्याच्या दोन मुली सोनी कुमारी आणि डिंपल कुमारी (वय अनुक्रमे 18 आणि 14 वर्षे) यांना पेटवून देण्यात आले. हे सर्वजण गाढ झोपेत असतानाच त्यांना पेटवण्यात आले. केदारनाथ यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.

मात्र दरवाजा बाहेरून बंद असल्याने ते बाहेर येऊ शकले नाहीत. त्यानंतर मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून सर्वांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत चौघांचाही जळून मृत्यू झाला होता. केदारनाथ यांच्या भावानेच हे सामुदायिक हत्याकांड घडवले आहे आणि ही घटना घडल्यापासून तो फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलीस अधीक्षक छोटेलाल यादव यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपास सुरु केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)