बिहारमधील बहुतेक आश्रमांमध्ये लैंगिक शोषण

टाटा इन्स्टिट्युटचा दावा 

पाटणा – बिहारमधील बहुतेक सर्व महिला आश्रयगृहांमध्ये लैंगिक शोषण होत असल्याचा दावा टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेसने केला आहे. बिहारमधील महिलांच्या आश्रमगृहांबाबत टाटा इन्स्टिट्युटने केलेल्या या पहाणीचा अहवाल बिहार सरकारच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आला आहे.

-Ads-

संपूर्ण बिहारमधील महिलांच्या आश्रयगृहांची पहाणी टाटा इन्स्टिट्युटच्यावतीने केली गेली. तेथील तथ्य धक्कादायक असल्याचे या अहवालामध्ये म्हटले आहे. बिहार सरकारने 2017 मध्ये आश्रमगृहांच्या पहाणीचे काम टाटा इन्स्टिट्युटकडे सोपवले होते. त्याचा अहवाल समाज कल्याण विभागाला यावर्षी एप्रिल महिन्यात सादर करण्यात आला आहे.

मुझफ्फरपूरमधील आश्रमगृहामध्ये मुलींबाबत अत्याचार आणि लैंगिक शोषण केले गेल्याचे निदर्शनास आले आहे. या आश्रमगृहाच्या व्यवस्थापनावर या अहवालात गंभीर प्रश्‍न उपस्थित केले गेले आहेत. या आश्रमगृहामधील 34 मुलींवर बलात्कार झाल्याचे नंतर वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. “सेवा कुटिर’ या एका अन्य आश्रमगृहात मुलींना मारहाण झाल्याची तक्रारही पुढे आली आहे. काम देण्याच्या आमिषाने आपल्याला येथे आणले गेल्याची तक्रारही काही मुलींनी केली होती.

मुलांच्या सुधारगृहामध्येही असेच चित्र पहायला मिळते. मोतीहारी जिल्ह्यातल्या “निर्देश’ सुधारगृहात मोठ्या मुलांबरोबर लहान मुलांना ठेवले जाते. त्यामुळे लहान मुलांचे लैंगिक शोषण होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. “सखी’ या मुलींच्या आश्रमगृहात मतिमंद मुलींच्या लैंगिक अत्याचार होत आहेत. तर भागलपूर जिल्ह्यात मुलांच्या आश्रमगृहामध्ये मुलांच्या तक्रारपेटीच्या कुलुपाची किल्लीच हरवली होती. त्यात अनेक गंभीर तक्रारींची पत्रे सापडली होती. मुंगर जिल्ह्यात “पनाह’ या आश्रमगृहाल्या मुलांना अधिक्षकांच्या घरी बळजबरीने काम करायला लावले जाते, अन्यथा मार दिला जातो. तर काही आश्रमगृहांमध्ये मुलींच्या बाथरूमला आतून कडीच नसल्याची धक्कादायक बाब उघड झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)