बिहारच्या समाजकल्याण मंत्री मंजू वर्मा यांचा राजीनामा

मुझफ्फरपूर बालिका गृह अत्याचार प्रकरण
पाटणा – बिहारच्या मुझफ्फरपूरमधील बालिका गृह अत्याचारप्रकरणी पतीचे नाव आल्यानंतर अखेर बिहारच्या समाजकल्याण मंत्री मंजू वर्मा यांनी राजीनामा दिला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी ब्रिजेश ठाकूरच्या कॉल डिटेल्समध्ये अनेक वेळा त्याचे आणि मंत्री मंजू वर्मा यांच्या पतीचे संभाषण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, बुधवारी न्यायालयात सुनावणीदरम्यान देखील आरोपी ब्रिजेश ठाकूर याने मंजू वर्मा यांच्या पतीला आपण ओळखत असल्याचे म्हटले होते. बिहारमधील या हायप्रोफाईल प्रकरणात विरोधी पक्षांकडून सामाजिक कल्याण मंत्री मंजू वर्मा यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होत होती. त्याचबरोबर या प्रकरणात जर त्या दोषी आढळल्या तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रकरणातील प्रमुख आरोपी ब्रिजेश ठाकूर याने मंत्री मंजू वर्मा यांच्या पतीसोबत 17 वेळा फोनवरुन संवाद साधला आहे. ही बाब ठाकूरच्या फोनमधील कॉल डिटेल्स रिपोर्ट आल्यानंतर उघड झाली होती. या प्रकरणाचा तपास करीत असलेली सीबीआय या सीडीआरची पडताळणी करीत आहे. दरम्यान, मंजू वर्मा यांचे पती चंद्रशेखर वर्मा यांचे बालिकागृहमध्ये अनेक वेळा येणे-जाणे झाल्याचा सुरुवातीलाच खुलासा झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)