बिहारच्या राज्यपालपदाची टंडन यांनी घेतली शपथ

पाटणा – भाजपचे ज्येष्ठ नेते लालजी टंडन यांनी आज बिहारचे 39 वे राज्यपाल म्हणूून शपथ घेतली. त्यांना पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मुकेश आर.शहा यांनी शपथ दिली. येथील राजभवनात झालेल्या राज्यपालांच्या शपथविधी सोहळ्याला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी उपस्थित होते.

टंडन यांनी जम्मू-काश्‍मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेल्या सत्यपाल मलिक यांची जागा घेतली. उत्तरप्रदेशचे रहिवासी असणाऱ्या टंडन यांची राजकीय कारकीर्द 70 च्या दशकात सुरू झाली. राज्य विधान परिषदेचे ते दोनवेळा सदस्य बनले.

उत्तरप्रदेशच्या मंत्रिपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या टंडन यांनी 2009 मध्ये लखनौ लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)