बिहारच्या माजी मंत्री मंजू वर्मा यांचे आत्मसमर्पण 

मुजफ्फरपूर बलात्कारप्रकरण : 1 डिसेंबरपर्यत सुनावली न्यायालयीन कोठडी 

बेगूसराय –
बिहारमधील मुजफ्फरपूर येथील शेल्टर होम बलात्कार प्रकरणी माजी मंत्री मंजू वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या तिखट टिपण्णीनंतर अखेर मंगळवारी न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले. मंजू वर्मा या बुरखा घालून आत्मसमर्पण करण्यासाठी न्यायालयात हजर झाल्या होत्या. न्यायालयाने त्यांना 1 डिसेंबरपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने तिखट टिप्पणी केली होती. न्यायालयाने बिहार सरकारला फटकारत राज्याच्या डीजीपींना हजर होण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
दरम्यान, न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पोलिसांनी 17 नोव्हेंबर रोजी माजी मंत्री मंजू वर्मा यांच्या बेगूसराय येथील घराबाहेर संपत्ती जप्त करण्यासंबंधीची नोटीस चिकटवली होती. अशा प्रकारे वाढत्या दबावानंतर अखेर वर्मा यांनी आज मंझौल न्यायालयात आत्मसमर्पण केले.

-Ads-

यापूर्वी मंजू वर्मा यांचे पती चंद्रशेखर वर्मा यांच्याविरोधात चेरिया बरियारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मंजू वर्मा फरार झाल्या होत्या. दरम्यान, मंजू वर्मा यांच्या पतीने 29 ऑक्‍टोबर रोजी आत्मसमर्पण केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)