बिस्कीट देण्याच्या अमिषाने बोलावून चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी

पुणे- बिस्कीट खायला देण्याच्या अमिषाने बोलावून सात वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 2 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश ए.एस.शिरसिकर यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.
अर्जून भिमा जाधव (वय 19, रा. न्यू एअरपोर्ट रोड, लोहगाव) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 1 नोव्हेंबर 2014 रोजी सायंकाळी 6.30 ते 7 या कालावधीत विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अरूंधती रासकर यांनी काम पाहिले. त्यांनी 8 साक्षीदार तपासले. चिमुकल्या पीडित मुलीने न्यायालयात निर्भिडपणे दिलेली साक्ष यामध्ये महत्त्वाची ठरली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त शाम मोहिते यांनी केला. सहायक पोलीस फौजदार एस.एन.बोंगाळे, पोलीस हवालदार जालिंदर भोर, महिला कर्मचारी सुवर्णा जगताप यांनी त्यांना सहाय केले. अर्जून हा पीडित मुलीला “बापूमामा’ नावाने परिचित होता. त्याने घरात एकटा असताना बोलावून तिच्यावर अत्याचार केला. याबाबत विमानतळ पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यावर सुनावणी करत भारतीय दंड संहिता कलम 376 (बलात्कार) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार न्यायालयाने जाधव याला शिक्षा सुनावली. पीडित मागासवर्गीय असल्याने ऍट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)