बिशप शाळेत प्रवेशासाठी पंतप्रधान कार्यालयाचे बनावट पत्र

पुणे – येरवडा भागातील बिशप या नामांकित शाळेत परिचयातील मुलाला प्रवेश मिळवण्यासाठी एका युवकाने पंतप्रधान कार्यालयाचे बनावट पत्र तयार करून शाळेच्या व्यवस्थापकाकडे सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात येरवडा पोलिसांनी त्या तरूणाला अटक केली आहे.

प्रणव भिकू चौधरी (वय 21, रा. सावित्री अपार्टमेंट, सोमवार पेठ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कल्याणीनगर येथील बिशप शाळेच्या प्राचार्या शेन मेकफरसन यांनी फिर्याद दिली आहे. येरवडा पोलिसांनी त्याला बुधवारी रात्री अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने दोन मुलांना शाळेत प्रवेश देण्यात यावा, या आशयाचे पंतप्रधान कार्यालयाची शिफारस असणारे पत्र शाळेच्या व्यवस्थापनाकडे सादर केले. त्यामुळे शाळेने व्हीव्हीआयपी कोट्यातून प्रवेश देण्यासाठी हालचाल सुरू केली. परंतु शंका आल्याने शाळेने पंतप्रधान कार्यालयात या पत्रासंबंधी चौकशी केली. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयातून सामाजिक पथकानेही पुण्यात येऊन त्या पत्राचा तपास केला असता, दोन्ही पत्रे बनावट असल्याचे उघड झाले. आरोपी प्रणवच्या ओळखीतल्या दोन मुलांना बिशप शाळेत तिसऱ्या इयत्तेत आणि पूर्वप्राथमिकला प्रवेश पाहिजे होता. परंतु सहजासहजी प्रवेश मिळत नसल्याने प्रणवणे ही बनावट पत्रे तयार केली.
इंटरनेटच्या साहाय्याने त्याने पंतप्रधान कार्यालय आणि अध्यक्ष, मिनिस्टर स्टेटस हायकोर्ट पावर ज्युरिसडेक्‍स्शन मेंबर ऑफ डिफेन्स ऍन्ड हायर पॉवर कमिटी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, न्यू दिल्ली या कार्यालयाचे लेटर पॅड तयार केले आणि त्यावर शिफारस पत्र तयार केल्याचे तपासात उघड झाले आहे. येरवडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गवारी तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)