बिवरीच्या माजी पोलीस पाटलासह 11 जणांवर गुन्हा दाखल

वाघोली- बिवरी (ता. हवेली) येथील बिवरी ते कोरेगाव मूळ या रस्त्याची 46 लाख रुपये किमतीची माती चोरून नेल्याप्रकरणी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून रस्ता बंद केल्याप्रकरणी माजी पोलीस पाटलासह 11 जणांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 16) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता सुधीर माने यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिवरी ते कोरेगाव मूळ या रस्त्याचे काम शासकीय निधीतून चालू होते. या रस्त्याची माती चोरून नेल्यामुळे ज्ञानोबा गोते, नानासाहेब गोते, बबन सोनबा गोते, जिजाबा सोनबा गोते, संपत जालिंदर खेडकर, भिवाजी त्रिंबक गोते, मारुती तुकाराम गोते, जालिंदर मारुती गोते, नितीन नारायण गोते, बापूसाहेब ज्ञानोबा गोते, दगडू सोनबा गोते, जालिंदर घुले या 12 जणांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय या जमीन मालकांनी अंदाजे 600 मीटर लांब आणि 9 मीटर रुंद , तसेच 2:50 मीटर खोल रस्ता पोकलेन मशीनने खोदून ट्रक डंपर (क्र. एमएच 12 – 3089, एमएच 12 पीक्‍यू 2748, एमएच 12 पी.क्‍यू-9099, एमएच 12 एचडी 3089) मधून अंदाजे 46 लाख रुपये किमतीची माती चोरून नेऊन सार्वजनिक वापरात असलेला रस्ता बंद केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे .पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल करीत आहेत. मातीचा चोरी एवढी विदारक आहे की बिबरी ग्रामस्थांना पावसाळ्यात या भागात चिखलाचे साम्राज्य पाहावयास मिळणार आहे.

  • मातीतील रहस्य उगडणार का?
    बिबरी रस्त्याची माती चोरी करून त्या मातीचे पुढे या माती चोरांनी काय केले, ही माती कोणाला विकली, ती माती कोणी खरेदी केली… या प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे. बिवरी ते कोरेगाव मूळ रस्त्याच्या माती चोरून नेण्याच्या या प्रकरणात अनेक दिग्गज मंडळींच्या नावांचा समावेश असून, ज्या साधनांद्वारे ही माती चोरून नेण्यात आली आहे, त्याचा अधिक तपास होण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
2 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)