बिल्डर विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी – पैसे भरूनही प्लॉट ग्राहकाच्या नावे न केल्यामुळे बी. के. जैन या बांधकाम व्यावसायिका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश कर्तार बिजलानी (वय-44 रा. पिंपरी कॉलनी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. बसंत कुमार कपुरचंद जैन उर्फ बी.के. जैन (वय-70, रा. श्रीधननगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या बिल्डरचे नाव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश बिजलानी यांनी 1990 साली जैन याच्या टेल्को कपूर सहकारी गृहरचना संस्थेत 3 लाख रुपयांना प्लॉट खरेदी केला होता. मात्र पैसे घोऊनही जैन हा मालकी देण्यास टाळाटाळ करीत होता.

बिजलानी यांनी सतत पाठपुरावा केला असता जैन याने व्यवहारासाठी म्हणून बिजलांनी यांच्यकडून प्लॉटच्या व्यवहाराची कागदपत्रे बिजलानी यांच्याकडून घेतली व त्यावर असलेला 43 नंबरचा प्लॉट चा क्रमांक खोडून त्यावर 1 असा क्रमांक टाकला. त्यानंतर बिजलांनी यांच्याकडून प्लॉट ट्रान्सफरसाठी 6 लाख 55 हजार रुपये घेतले. मात्र अद्याप ताबा दिला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)