बिल्डरला घर विकण्यास बंदी

मुंबई : काही कारणास्तव घर खरेदीचा करार रद्द करणाऱ्या आणि दिलेल्या मुदतीत ग्राहकाला त्याने गुंतवलेले पैसे परत न देणाऱ्या बिल्डरांना दणका देणारा निर्णय महारेराने घेतला आहे. जोपर्यंत बिल्डर ग्राहकाला पैसे परत देणार नाही, तोपर्यंत गृहनिर्माण प्रकल्पातील एकही सदनिका विकण्यास महारेराने बंदी घातली आहे.

काही ग्राहक घर खरेदी करतात, बिल्डर सोबत करार करतात तसेच पैसेही भरतात. परंतु काही कारणास्तव त्यांना हा व्यवहार पुढे नेता येत नाही. त्यामुळे ते व्यवहार रद्द करून गुंतवलेले पैसे परत देण्याची मागणी बिल्डरकडे करतात. परंतु बिल्डर पैसे देण्यास टाळाटाळ करतात, किंवा विलंब लावतात. त्यामुळे ग्राहकाची अडचण होते. बिल्डरांच्या या टोलवाटोलवीला आता चाप बसणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)