बिल्डरच्या मुलावर गोळीबार ; प्रकरणात 5 जणांना कोठडी

पुणे – बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार करून हल्ला केल्याप्रकरणात वानवडी पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली. न्यायालयाने पाचही जणांना 8 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आदेश दिला आहे.
अजीम ऊर्फ अंट्या महंमद हुसेन शेख (22), एजाज सत्तार पठाण (33, सय्यदनगर, महंमदवाडी रोड, हडपसर), तनवीर शकील शेख (28, सय्यदनगर, मूळ रा. गोडवली, जि. सातारा), राजेश दिलीप पवार (24, रा. सटलमेंट चौक, सोलापूर), सोहेल अनिस पठाण (23, आंबेडकर चौक, लातूर) अशी पोलीस कोठडी झालेल्या पाच जणांची नावे आहे. यापूर्वी सद्दाम सलीम पठाण (24, रा. सय्यदनगर, महंमवाडी रोड, हडपसर) याला अटक झाली असून त्याला 9 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पिस्तुलातून गोळ्या झाडणारा सराईत टिपू पठाण आणि त्यांच्या अन्य सहा साथीदारांचा पोलीस शोध घेत आहे.

याबाबत नीलेश शेखर बिनावत (25, रा. केशवानंद बंगला, सातवनगर, हांडेवाडी रोड, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. 5 जानेवारी रोजी मध्यरात्री नीलेश बिनावत यांच्या केशवानंतर बंगल्याच्या परिसरात आरोपी टिपू आणि त्याच्या साथीदारांनी दहशत माजवून नीलेश यांच्यावर गोळीबार केला. याप्रकरणी पाचही जणांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. फरार टिपूसह इतरांचा शोध घ्यायचा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुन्हा करण्यामागचे नेमके कारण काय होते ? गुन्ह्याचा कट आरोपींनी कोठे रचला, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. त्याला बचाव पक्षाचे वकिलांनी विरोध करताना “पिस्तूलातून गोळ्या टिपूने झाडल्या आहेत. पाचही जणांना गुन्ह्याशी काहीही संबंध नसून पाचही जणांना विनाकारण अटक करण्यात आली आहे,’ असे सांगितले. गुन्ह्याचा तपास वानवडी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस. आर. शिंदे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)