बिल्डरची 40 लाख रुपयांची फसवणूक प्रकरणात दांपत्याला तात्पुरता अटकपूर्व

पुणे – भागीदारीमध्ये बॅंकेतून काढलेल्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बिल्डरने दिलेले 40 लाख रुपये बॅंकेत न भरता फसवणूक केल्याप्रकरणी दांपत्याला सत्र न्यायाधीश अनिरूध्द थित्ते यांनी तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे. पोलिसांना तपासासाठी सहकार्य करायचे, पुराव्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही, न्यायालयाच्या परवानगी शिवाय न्यायिक क्षेत्र सोडून जायचे नाही, या अटींवर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
मिहीर चंद्रकांत अमीन (वय 51) आणि त्याची पत्नी प्रतिभा (वय 49, दोघेही, रा. निगडी) या दोघांना जामीन मंजुर झाला आहे. या प्रकरणात बचाव पक्षातर्फे ऍड. रोहन नहार काम पाहत आहेत. याबाबत पवन महावीर वर्मा (वय 45, रा. निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 23 जानेवारी 2016 रोजी घडली. फिर्यादी आणि मिहीर दोघे दोस्त आहेत. दोघांनी भागीदारामीध्ये एरंडवणा भागातील ऋषीराज कंट्रक्‍शनच्या भालचंद्र अपार्टमेंट या कमर्शियल इमारतीतील 1,10 आणि 11 असे तीन अपार्टमेंट घेण्याचे ठरवले. भागीदारीमध्ये खरेदीही केली. यासाठी सहा कोटी रुपये धनकवडी येथील भारत को-ऑपरेटीव्ह बॅंकेकडून कर्ज घेतले. कर्जासाठी फिर्यादींचा बंगला बॅंकेकडे गहाण ठेवला. दरमहा 11 लाख 41 हजार 38 रुपये हप्ता ते नियमित भरत होते. मात्र, पुढीळ काळात काही कारणांनी हप्ता भरू शकले नाहीत. त्यावेळी फिर्यादींना बंगला सील करणार असल्याचे बॅंकेकडून सांगण्यात आले. त्यावेळी अमीन आणि प्रतिभा या दोघांनी त्यांच्याकडे हप्ता भरण्यास पैसे नसल्याचे सांगितले. मात्र, बंगला जप्त होऊ नये, या भीतीपोटी फिर्यादींनी 23 जानेवारी 2016 रोजी मिहीर आणि प्रतिभा यांना 40 लाख रुपये दिले. मात्र, दोघांनी ते पैसे बॅंकेत न भरता फिर्यादींची फसवणूक केली. पैसे घेताना मिहीर याचा भाऊ वीरेश तेथे होता. त्यामुळे त्याच्यावरही गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात मिहीर, प्रतिभा यांनी ऍड. रोहन नहार यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. दोघांनी जन्मठेप अथवा मृत्यूदंड होईल, असा गुन्हा केलेला नाही. घटनेनंतर तब्बल दोन वर्ष विलंबानी गुन्हा दाखल केला आहे. इतके दिवस फिर्यादी का शांत राहिले, कर्ज मिहिर कुटुंबिय आणि फिर्यादी यांच्या वर्मा कुटुंबियात भागीदारीमध्ये होते. तर वर्मा यांनी स्वत: हप्ता का भरला नाही, हे विचार करण्यासारखे आहे. अमीन दांपत्याने पत्ता दिला आहे. तिथे त्यांची संपत्ती आहे, ते परांगदा होणार नाहीत. न्यायालयाच्या अटी, शर्तीचे पालन करण्यास तयार आहे. त्यामुळे त्यांना जामीन द्यावा, असा युक्तीवाद ऍड. नहार यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने दोघांना जामीन मंजुर केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)