“बिर्ला हॉस्पिटल’वर निरीक्षकाची नियुक्ती; विविध प्रकरणांची चौकशी करणार!

पिंपरी- थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून नागरिक, रुग्णांच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत सर्व प्रकाराची चौकशी करावी याकरिता धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाने निरीक्षकाची नियुक्‍ती केली आहे.
धर्मादाय रुग्णालयांमध्ये दाखल होणारा आर्थिक दुर्बल घटकांतील गोरगरीब रुग्ण मोफत उपचारास पात्र नसेल, तर त्याबाबत संबंधित रुग्ण व त्याच्या नातेवाइकाला न कळविता उपचार नाकारू नयेत, त्याबाबतचा अहवाल धर्मादाय आयुक्‍त कार्यालयाला सादर करावा. तसेच, गरीब रुग्णांवरील मोफत उपचार योजनेची माहिती रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्याचे आदेशही धर्मादाय आयुक्‍तांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे रुग्णालयाच्या नावात धर्मादाय किंवा चॅरिटेबल असा उल्लेख करण्याबाबत आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी न केल्याने धर्मादाय आयुक्‍त कार्यालयाने आदित्य बिर्ला रुग्णालयाला फटकारले आहे.
थेरगाव येथील आदित्य बिर्ला हे धर्मादाय रुग्णालय आहे. हे रुग्णालय शासनाचे विविध फायदे लाटत आहे. त्यामुळे या रुग्णालयाने कायद्यानुसार आर्थिक दुर्बल घटकांतील गरीब रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यास त्यावर मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार करणे बंधनकारक आहे. परंतु, बाहेरून पंचतारांकित वाटणारे आदित्य बिर्ला रुग्णालय गरीब रुग्ण उपचारास आलेल्यांना डावलेले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे शहरातील सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. 10) पुण्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालयात आंदोलन केले. तसेच, थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या मुजोरीपणाविरोधात कारवाईचे लेखी आदेश दिले जात नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)