बिबवेवाडीत भरदिवसा गोळीबार; एक जखमी

पुणे/ बिबवेवाडी- बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्हीआयटी कॉलेजजवळील मारुती मंदिरासमोर गुरुवारी भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना घडली. एका पोलीस कर्मचाऱ्याकडून झालेल्या गोळीबारात एकजण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा झालेल्या गोळीबाराने परिसरात खळबळ चांगलीच खळबळ उडाली. जखमीवर डेक्‍कन येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलीस कर्मचारी अशोक विलास ढावरे (24, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. गोळीबारात गणेश कांबळे गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी गणेश याचा भाऊ आकाश कांबळे (27, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) यानी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई ढावरे व गणेश कांबळे दोघेही मित्र आहेत. बुधवारी दुपारच्या सुमारास दोघेही व्हीआयटी कॉलेजच्या परिसरात असलेल्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते.

यावेळी मंदिरासमोरच ढावरे यांची बुटाची लेस सुटली. ती बांधण्यासाठी ढावरे वाकले असता त्याच्याकडून ट्रीगर दबला गेला. यामुळे पिस्तूलातून गोळी सुटुन शेजारीच उभा असलेल्या सहकारी कांबळे यांच्या पोटात गोळी लागली. यात कांबळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर डेक्‍कन येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा संतोष बर्गे करत आहेत.

याप्रकरणी स्वारगेट पोलीस विभागाचे सहायक पोलीस आयुक्‍त डॉ. शिवाजी पवार म्हणाले, गोळीबार प्रकार हा बुटाची लेस बांधताना किंवा चेष्टामस्करीतून घडल्याचे समजत आहेत. त्यादृष्टीने पुढील तपास सुरू आहे. त्यानंतर यातील खरा प्रकार उघडकीस येईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)