बिबट्या करतोय दुचाकीचा पाठलाग

संग्रहित छायाचित्र...

ओतूर- नेतवड माळवाडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत आज (रविवारी) पहाटे बिबट्याने दुचाकीवर हल्ला करुन दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेला जखमी केले. दरम्यान, घटनास्थळी बिबट मादी व बछड्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या असून बिबट्या दुचाकींचा पाठलाग करीत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
सुरेखा सुदाम बनकर( वय 50 रा.फुलसुंदरमळा, नेतवड माळवाडी ता.जुन्नर) या जखमी झाल्या आहेत. त्या मुलगा विशाल व पती सुदाम यांच्या बरोबर रात्री दुचाकीवरुन गावातून घरी फुलसुंदरमळ्यात चालल्या होत्या. गणपती मंदिराजवळ कालव्याच्या बाजुला बिबट्याने अचानक त्यांच्या दुचाकिवर हल्ला केला आणि त्यात सुरेखा बनकर जखमी झाल्या. हल्ला केल्या नंतर ही बिबट्याने त्यांचा काही अंतर पाठलाग केला. त्यानंतर त्याना ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, ही घटना माजी सरपंच संतोष कदम याना समजल्यावर त्यांनी वनविभागाशी संपर्क साधला. त्यानंतर ओतूर वनविभागाचे वनपाल विशाल अडागळे व वनरक्षक एस. ऐ. राठोड, ओझर विभागाच्या वनरक्षक कांचन ढोमसे यांनी जखमी महिलेची भेट घेतली. तसेच अडगळे व राठोड यांनी बिबट्याचा हल्ला झालेल्या ठिकाणी भेट देऊन ग्रामस्थांसह पाहाणी केल्यानंतर येथे बिबट मादी व बछड्याच्या पाऊलखुणा त्याना आढळुन आल्या तर ढोमसे या जखमी महिले बरोबर पिंपरी-चिंचवड शासकीय रुग्णालयात बिबट प्रतिंबधक लस देण्यासाठी घेवून गेल्या. दरम्यान, परिसरात वनविभागाने पाहाणी करुन पिंजरा लावावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)