बिबट्याने पाडला दोन वासरांचा फडशा

संग्रहित छायाचित्र...

पारगाव शिंगवे- येथील ढोबळेमळा येथील शेतकरी निवृत्ती आनाजी ढोबळे यांच्या दोन वासरांवर बिबट्याने हल्ला करून त्यांचा फडशा पाडला आहे. ही घटना रविवारी (दि. 18) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडली.
ढोबळेमळा येथील शेतकरी ढोबळे यांचा मुलगा शशिकांत हे पहाटे मळ्यामधील लग्नाची वरात संपल्यावर घरी आले होते व गाईंचे दूध काढण्यासाठी गोठ्यात गेले व त्यांनी दीड वर्षांच्या दोन वासरांना गोठ्यातून बाहेर काढून शेतात बांधले. त्यावेळी शेतात लपून बसलेल्या बिबट्याने वासरांवर हल्ला केला. ढोबळे हे दूध काढून झाल्यावर गोठ्यातून बाहेर आले असता त्यांना दोन वासरे गयाब झालेली दिसली. त्या ठिकाणी रक्ताचे डाग पडले होते. शोधाशोध केली असता उसाच्या शेतात एक वासरू व शेताच्या बांधावर दूसरे वासरू मृत अवस्थेत आढळले. या परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)