बिबट्याच्या हल्ल्यात सात जखमी

मंचर- घोडेगाव परिसरात गुरुवारी रात्री ऊसाच्या शेतातून अचानक बाहर आलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सात जण जखमी झाले आहेत. जखमींना पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात भर्ती करण्यात आले असून त्यांना रेबीज लस देण्यात आली आहे. दरम्यान बिबट्यास जेरबंद करण्यासाठी वनखात्याने 2 पिंजरे लावले आहेत, अशी माहिती घोडेगाव वन परिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांनी दिली.
गुरुवारी रात्री घोडेगाव परिसरातील ऊसाच्या शेतातून अचानकपणे बिबट्या बाहेर आला. त्यामुळे तेथुन मोटारसायकलवरुन जाणारे दुचाकीस्वार घाबरले. घाबरुन ते जमिनीवर पडल्याने बिबट्याने त्यांना पंज्याने जखमी केले. या घटनेत शेतकरी सागर क्षीरसागर (वय 25, रा. घोडेगाव), निलंबर झाकडे (वय 35, रा. घोडेगाव), उत्तम टेकवडे (वय 55, रा. अमोंडी), राम बिबवे (वय 42, रा. अमोंडी), सुशांत फलके (वय 20, रा. अमोंडी), अमोल काळे (रा. धोंडमाळ), राजू काळे (रा. घुलेवाडी) हे जखमी झाले होते. सदर जखमींना शासकीय वाहनातुन पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात भर्ती करण्यात आले व त्यांना रेबीज लस देण्यात आली आहे, अशी माहिती योगेश महाजन यांनी दिली.
वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी भेटून जखमींना धीर दिला. दरम्यान धोंडमाळ आणि हॉटेल सह्याद्रीजवळ बिबट्याला पकडण्यासाठी दोन पिंजरे लावले आहेत. दिड महिन्यांपूर्वी घोडेगाव येथील बी. डी. काळे महाविद्यालयाजवळ डॉ. अतुल चिखले यांच्या शेताजवळ आलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते असे सांगून वनपरिक्षेत्र अधिकारी महाजन म्हणाले की, त्यानंतरही बिबट्याचा वावर असल्याने सकाळी, पहाटे किंवा सायंकाळी व्यायामासाठी फिरणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी. वनखात्याचे अधिकारी, कर्मचारी ग्रामस्थांमध्ये जाऊन जनजागृती करीत आहेत. काही शेतकऱ्यांनी बिबट्याची मादी दोन पिल्लांसह फिरत असल्याचे सांगितले. जर मादीची पिल्ले चुकुन पिंजऱ्यात सापडली तर मादी चिडुन जावुन हाहाकार करेल. यासाठी बिबट्या जेरबंद करण्यासाठी उपाययोजना केल्या जात असून शेतकऱ्यांनी शेतात काम करीत असताना सावधानता बाळगावी.
घोडेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात काम करीत असताना बिबट्यापासून विशेष काळजी घ्यावी. कधीही बिबट्याचा पाठलाग करु नये. त्याला जखमी करु नये. तो उलटा हल्ला करु शकतो. मुलांना एकटे सोडु नये. मुलांनी घोळक्‍याने फिरावे. बिबट्या दिसल्यास जोरात-ओरडा करावा. खाली वाकु नये. लहान मुलांची पालकांनी विशेष काळजी घ्यावी. त्यांना एकट्याला सोडू नये. गावाजवळ मोकाट कुत्रे, बकऱ्या व डुकरे यांची संख्या कमी करणे. गुरे रात्रीच्यावेळी गोठ्यात बांधताना गोठा सर्व बाजूंनी बंदिस्त राहील याची काळजी घ्यावी. बिबट्याचे अस्तित्व जाणवल्यास नजिकच्या वनपरिक्षेत्र कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन महाजन यांनी केले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)