बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

जेजुरी- पुरंदर तालुक्‍यातील पिंगोरी नजीक असणाऱ्या पोखरण वस्तीवर शनिवार सायंकाळी बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. त्यामध्ये एक शेळी ठार झाली आहे. पुरंदर तालुक्‍यात वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
पोखरण वस्तीवर विट्टल जगन्नाथ गायकवाड शेळ्या चारत होते. त्यावेळी बिबट्याने शेळ्यांवर अचानक हल्ला केला. त्यामध्ये एक शेळी ठार झाली. जेजुरी वनविभागाचे वनरक्षक बाळासाहेब गोलांडे यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. यावेळी वनविभागाचे कर्मचारी गजानन बयास, बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते. पिंगोरी परिसरातील नागरिकांनी अपरात्री बाहेर न पडण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. यापूर्वी ही पुरंदर तालुक्‍यातील तरसदरा येथे मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यामध्ये दोन मेंढ्या ठार झाल्या होत्या. तर दोन जखमी झाल्या होत्या. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी परिसरात पिंजरे लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)