डिंभे -आंबेगाव तालुक्‍यातील गोनवडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात शिवाजी नथू मंडलिक यांच्या दोन शेळ्या ठार झाल्या तर रोहिदास रामभाऊ गाडे यांच्या लॅब जातीचा 1 पाळीव कुत्रा गंभीर जखमी झाला आहे. याशिवाय 5 ते 6 गावांतील मोकाट कुत्र्यांनाही बिबट्याने आपले भक्ष्य बनवले आहे.
रात्री 1 ते 2च्या सुमारास या बिबट्याचे हल्ले होत आहेत. त्यामुळे संपूर्ण गोनवडी गावातील शेतकरी बांधव दहशतीखाली आहेत. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून बिबट्याने गावामध्ये धुमाकूळ घातला असून भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. वन विभागाकडे तक्रार केली असता कोणतीही मदत वन विभागाकडून होत नाही. गावकऱ्यांनी गावामध्ये वन विभागाकडून बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. वन अधिकारी महाजन यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता मिटींगमध्ये आहे, असे उत्तर मिळाले. वनविभागाच्या भोंगळ कारभारामुळे गोनवडी गावातील पाळीव प्राणी तसेच गावातील सर्व नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)