बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ गंभीर जखमी

संग्रहित छायाचित्र...

ओझर- ओझर (ता. जुन्नर) जवळील परिटवाडी गावातील वाघिरा परिसरात शेळ्या-मेंढ्यांच्या कळपाबरोबर शेतात उघड्यावर झोपलेल्या एका 16 वर्षीय मेंढपाळ मुलावर बिबट्याने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी (दि. 20) पहाटे चारच्या दरम्यान घडली असल्याची महिती वनविभागाकडून देण्यात आली. या घटनेमुळे पुन्हा या परिसरात बिबट्याची दहशत बसली असून, पूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, परिटवाडी गावातील वाघिरा (ता. जुन्नर) परिसरात काही दिवसांपूर्वी चाऱ्याच्या शोधात मेंढपाळ आलेले असून, त्यांचा एक कळप येथे आहे. भक्ष्याच्या शोधात सोमवारी (दि. 20) पहाटे आलेल्या बिबट्याने रात्री झोपलेल्या मेंढपाळावर जोरदार हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी केले. त्याच्या डोक्‍यावर खोलवर जखम झाली असून त्याच्यावर प्रथम नारायणगाव येथील खासगी दवाखान्यात उपचार करून पुढील उपचारासाठी पिंपरी, पुणे येथील यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.

  • उसतोडणी कामगारांवर हल्ल्याची शक्‍यता

गेल्या वर्षी नारायणगाव वन परिमंडलात येणाऱ्या हिवरे खुर्द (ता. जुन्नर) या गावात तसेच सध्या जी घटना घडली तेथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात एक ऊसतोड मजूर महिला सविता वायसे ही बिबट्याच्या हल्ल्‌यात मृत्युमुखी पडली होती. हा संपूर्ण भाग बिबट्याप्रवण क्षेत्र असल्याने, तसेच उसतोडणीच्या हंगाम सुरू झाल्यावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मानव आणि बिबट्या संघर्ष घडलेला पाहावयास मिळतो. या गंभीर प्रश्नी वनविभागाकडून ठोस उपाययोजना होणे गरजेचे असून हा संघर्ष कमी होईल याकडे त्यांचे लक्ष वेधले पाहिजे, जेणेकरून कोणतीही मनुष्य हानी होणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)