बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी महिलेच्या वारसदारांना आर्थिक मदत

संग्रहित छायाचित्र

ओझर – हिवरे खुर्द येथे एक महिला बिबट्याच्या हल्ल्यात दि. 21 जानेवारी रोजी गंभीर जखमी होऊन त्या महिलेचा पुणे येथील रुग्णालयात मृत्यू झाला होता. मंगळवारी (दि. 27) मृत महिलेच्या वारसदार यांना जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे यांच्या हस्ते जुन्नर येथील कार्यालयात 8 लाख रुपयांचा आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. जुन्नर तालुक्‍यातील हिवरे खुर्द या ठिकाणी ऊस तोडणीसाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता.

या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली होती. पुढील उपचारासाठी या महिलेला पुणे येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. उपचारा दरम्यान या महिलेचा मृत्यू झाला होता. त्या मृत महिलेचे नाव सविता वायसे असून त्यांचे वारसदार म्हणून पती भिमराव वायसे यांना हा धनादेश दिला गेला. यावेळी सहायक वनसंरक्षक युवराज मोहिते, वन परिक्षेत्र अधिकारी जयवंत पिसाळ, कार्यालय निरीक्षक एस. डी. काळे, सोपान डेंगळे, लिपीक सुरेश कुडदुलवार, वनपाल मनिषा काळे, वनरक्षक कांचन ढोमसे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)