बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

कराड – बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्याची घटना डेळेवाडी (ता.कराड) येथील खोरी नावाच्या शिवारात सोमवारी पहाटे घडली. दरम्यान, पहाटे शेतात निघालेल्या एका युवकाने बिबट्याला पाहिल्याने आरडाओरडा केल्याने ग्रामस्थांनी धाव घेतली. लोक जमा झाल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. डेळेवाडी येथील महादेव विष्णू बाबर यांनी 20 शेळ्या पाळल्या आहेत.

त्यांच्या शेळ्यांच्या शेडमध्ये घुसून बिबट्याने त्यातील दोन शेळ्यांवर हल्ला करुन त्यांना ठार मारले. पहाटे राहुल बाबर हा शेतात निघाला असताना त्याने बिबट्याला पाहिले आणि आरडाओरडा केला. त्यामुळे ग्रामस्थ व युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या दंग्यामुळे बिबट्याने तेथून धूम ठोकली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)